श्री ज्ञानदा प्रकाशन

नमस्कार मित्रांनो ! मी संपादक

प्रा.अमोल रतन श्रीमंत तरंगे

B.E (Mech.) M.Tech (Mech.) (Pune university).
माझे मुळ गाव मु. पो. तरंगफळ ता. माळशिरस जि. सोलापुर. अतिशय ओसाड सुळकाई तुकाई डोंगराच्या पायथ्याशी वसलेले छोटेसे गाव. लोकांचा मुख्य व्यवसाय मेंढीपालन, मजुरी आणि काही प्रमाणात शेती, प्रचंड पाणी टंचाई, दुष्काळग्रस्त भाग. ह्याच गावामध्ये जि. प. प्राथमिक शाळा तरंगफळ ह्या मराठी शाळेमध्ये माझे 1 ली ते 7 वी पर्यंतचे शिक्षण पुर्ण झाले. पुढे 8 वी ते 10 वी माध्यमिक शिक्षण माळशिरस प्रशाला माळशिरस येथे पुर्ण झाले आणि इ. 11 वी / 12 वी (सायन्स) गोपाळराव देव प्रशाला व ज्यु. कॉलेज माळशिरस ह्या ठिकाणी पुर्ण झाले. घरची परिस्थिती अतिशय हालाखीची असल्याने प्रचंड अभ्यास करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आई वडीलांनी दिलेले चांगले संस्कार व शिक्षणाचा पाठिंबा यामुळे मी 1 ली ते 12 वी पर्यंत वर्गामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो. इ. 12 वी (सायन्स) ला चांगले गुण मिळाल्यावर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग चे पदवी शिक्षण सांगली जिल्ह्यात, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग and टेक्नॉलॉजी, आष्टा ता. वाळवा (सध्याचे महाराष्ट्रातील नामांकित Autonomous college) मध्ये विशेष प्राविण्याने (distinction) मध्ये पुर्ण केले. त्यावेळेस शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ह्या university मध्ये mechanical engineering ह्या विभागात university ranker (पहिल्या 10 rank) मध्ये येण्याचा मान मिळवला
पहिल्यापासून शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी करण्याचा मानस असल्याने B.E. झाल्यावर इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवण्यासाठी पुण्यात गेलो. वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक, विभागप्रमुख, प्राचार्य पॉलिटेक्नीक कॉलेज हि पदे कमी वेळेत व कमी वयात पुर्ण केली. ह्या काळातच M.Tech (mechanical) चे शिक्षण मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे ह्या ठिकाणी पुर्ण केले. 2007 ते 2014 पर्यंत पुण्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य अतिशय चांगल्या रितीने पुर्ण केले. मुलांच्या व पालकांच्या विनंतीने Pune university, Shivaji university व Solapur university ह्या वेगवेगळ्या विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांचे अवघड विषयांचे coaching classes घेतले व त्यांना चांगले result मिळवून दिले. परंतू एवढ्यावर मन राहवत नव्हते, शिक्षण क्षेत्रामध्ये आणखी काहीतरी वेगळं करावे असे नेहमी वाटत होते. इंजिनिअरिंगला शिकवत असताना, एक गोष्ट लक्षात आली की, पुण्यामध्ये शिक्षण घेण्यास आलेले विद्यार्थी हे ग्रामीण / खेडेगावीतील होते. त्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झालेले होते व त्यांना प्रथम वर्षामध्ये शिकताना English to English मध्ये शिकवलेले सर्व समजत नव्हते, त्यामुळे आम्हाला English मिक्स मराठीमध्ये शिकवावे लागत होते, मग माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, जर आपण मुलांना वर्गात शिकवताना English मिक्स मराठी मध्ये शिकवतो आहे, वर्गामध्ये मुलांना व्यवस्थित समजत आहे, मात्र घरी अभ्यास करताना त्यांच्याकडे वही किंवा पुस्तकामध्ये लिहिलेली माहिती पुर्ण English मध्ये आहे, वर्गात शिकवलेली एखादी concept विसरली तर मुलांना परत त्याचा अर्थ समजणारी Books किंवा study material नाही आणि माझ्या डोक्यात एक संकल्पना आली की, आपण अशी पुस्तके काढू कि, त्यामध्ये दोन्ही भाषेत सर्व गोष्टी असतील. English मधून देऊ, ते विद्यार्थी परिक्षेमध्ये लिहितील आणि scientific मराठी मध्ये देऊ, ते मुलांना अभ्यास करताना सर्व समजेल आणि स्थापना झाली श्री ज्ञानदा पब्लिकेशन, पुणे ची (सन 2015- जानेवारी)
चांगल्या पगाराची, चांगल्या पदाची असलेली इंजिनिअरिंग कॉलेज मधील नोकरी सोडून, प्रचंड मोठी risk घेऊन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी विशेष सखोल ज्ञान मिळावे ह्या उदात्त हेतूने ज्ञानदा प्रकाशनचे काम सुरु केले. 2015 ते 2018 ह्या चार वर्षामध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंग च्या वेगवेगळ्या शाखांमधील एकुण 25 विषयांची पुस्तके चक्क! English व scientific मराठीमध्ये लिहिली. त्याची छपाई करून महाराष्ट्रातील जवळपास 27 28 जिल्ह्यांमधील विद्यार्थी / प्राध्यापक यांचेपर्यंत पोहोचवली. 27 28 जिल्ह्यांमध्ये हा प्रवास मोटार सायकलने केला. प्रचंड संघर्ष केला, खर्च खूप होता आणि मिळणारे उत्पन्न कमी होते, मात्र न खचता, न डगमगता अखंड प्रवास चालू ठेवला. एकदा माझ्या मित्राने हि पुस्तके पाहिल्यावर त्याला खूपच अभिमान वाटला व त्याने इ. 1 ली ते 12 वी पर्यंतची पुस्तके काढण्याचा सल्ला दिला. बऱ्याच जिल्ह्यातील शिक्षक, प्राचार्य यांचे मत घेऊन. 2019 ला डिप्लोमा इंजिनिअरिंग च्या पुस्तकांचे लिखान थांबवून इ. 11 वी/ 12 वी (सायन्स) ची Physics, Chemistry, Biology व Mathematics ह्या पुस्तकांचे लिखान दोन भाषेत करून ती प्रकाशित केली. Science शाखेमध्ये प्राध्यापक व विद्यार्थी यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि शाळेतूनच सल्ला मिळाला कि, 8 वी ते 10 वी (सेमी माध्यम) ची पुस्तके काढावीत आणि मग लेखणी सेमी माध्यमकडे वळली, त्यानंतर नवीन अभ्यासक्रमानुसार 8 ते 10 वी (सेमी माध्यम) व 11/ 12 वी science च्या पुस्तकांची निर्मिती केली. 2020 व 2021 मध्ये कोरोनाचा काळ होता, त्या काळात पुस्तकांचे लिखान चालूच ठेवले. शाळा बंद असल्याने ते शाळांपर्यंत पोहोचवता आले नाही. शैक्षणिक वर्ष 2022 पासुन मात्र विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादामुळे हि पुस्तके महाराष्ट्रातील जवळपास 15 जिल्ह्यांमध्ये पोहचवता आली. सुरुवातीचा काळ प्रचंड संघर्षाचा होता, छपाई साठी पुरेसे पैसे नसल्याने, मार्केटिंगसाठी चांगल्या गाड्या नसल्याने पुरवठा वेळेत होत नव्हता. आत्ता परिस्थिती बदलली, पुस्तकांमधुन मिळालेल्या पैशातून चांगले गोडाऊन बांधता आले, गाड्या मिळाल्या. एक गोष्ट नक्की समजली ... काही झालं तरी थांबायचं नाही, काम करत राहायचं. अविरत पुस्तक लिहित राहिलो ... विद्यार्थ्यांचे समाधान झाले, त्यांच्या आनंदी चेहऱ्यातून प्रेरणा मिळत गेली, लेखणी अजूनही थांबली नाही. दरम्यानच्या काळात आपली हि पुस्तके शासन दरबारी न्यावीत म्हणून तत्कालीन शिक्षणमंत्री मा. ना. विनोद तावडे साहेब यांचेकडून पाठीवर कौतुकाची थाप मिळाली, प्रोत्साहन मिळाले. त्यानंतर शिक्षणमंत्री मा. ना. दिपक केसरकर साहेब, शिक्षणमंत्री मा. ना. दादाजी भुसे साहेब, उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत साहेब यांचेकडून शाबासकी मिळाली. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ, पुणे चे तत्कालीन संचालक मा. अमोल येडगे साहेब यांनीही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हि पुस्तके किती चांगली आहेत, त्याबद्दल मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. MHT CET मध्ये लाखो विद्यार्थ्यांना प्रश्नाचा अर्थ समजत नसल्याने विद्यार्थ्यांना योग्य Answer पर्यंत पोहचता येत नव्हते. ज्ञानदा प्रकाशनच्या माध्यमातून Physics, Chemistry, Biology व Mathematics ह्या विषयांचे जवळपास 5000 पेक्षा जास्त MCQ's चे English mix - मराठी मध्ये अर्थ देऊन त्याचा कोणता option बरोबर आहे, त्याचे explanation सुद्धा English mix मराठी मध्ये लिहून प्रकाशित करण्याचा बहुमान महाराष्ट्रात प्रथमच मिळवला. हि पुस्तके लिहिताना रात्रीचा दिवस केला. कधी कधी रात्रभर काम केले, सुट्टी घेतली नाही. कार्यक्रम, मनोरंजन ला कमी वेळ दिला. कारण त्याग केल्याशिवाय कोणतेही काम निश्चित ध्येयापर्यंत पोहचत नाही. आत्ता New Education Policy - (NEP) नविन शैक्षणिक धोरण आले आहे. इ. 1 ली ते 12 वी चा नविन अभ्यासक्रम येत आहे. शिक्षक विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह आहे, ह्या पुस्तकांची मागणीही आहे. त्यामुळे पुन्हा नव्या जोमाने व त्याच उत्साहात सर्व विषयांची पुस्तके, एक आदर्श ज्ञान घेऊन ... नवी आदर्श पिढी घडविण्यासाठी सज्ज आहे. मला माहित आहे की, ज्ञानाची हि गंगा अखंड वाहत होती, वाहत आहे आणि अखंडपणे ती वाहत राहणार आहे, मात्र ज्ञानगंगेच्या ह्या प्रवाहाचा एक भाग मला होता आलं, हे मी माझं भाग्य समजतो. शेवटी दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे की,
" जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन... " शेवटी आपल्या प्रकाशनाचे नावच " ज्ञानदा " आहे, जे ज्ञान वाटत आहे.

श्री ज्ञानदा पब्लिकेशन...

स्वाभिमान मातृभाषेचा ... सन्मान मराठीचा ...
" सर्वांना सर्व समजणार ... आत्ता ! पुस्तक पाहिल्याशिवाय कळणार नाही... "
Contact ( आमचा संपर्क )

Call + Whatsapp : 9225110570 Call : 9657961490
Email-Id
shreednyanadapublication@gmail.com

Amol shrimant tarange

Address :

Distribution Head Office. Dnyanada Publication House Behind ST Stand, In Front of Akluj Hospital, Akluj Tal-Malshiras Dist- Solapur Pin-413101

Scroll to Top